Pune Suicide: पुण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू
Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे (Suicide) सत्र सुरुच आहे. राज्यातील विविध कोपऱ्यातून हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच पुण्यातील (Pune) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांनी (Assistant Sub-Inspector) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

राजेश दगडू महाजन (वय, 50) असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. महाजन हे पुणे शहर पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. महाजन हे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते पोलीस दलात रुजू झाले होते. दरम्यान, महाजन यांनी आज (30 ऑगस्ट) दुपारी त्यांच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. महाजन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यातील घटना! मुलीला जन्म दिला म्हणून बायकोची हत्या, नवऱ्याला अटक

मुंबई गेल्या आठ दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सुरेश चव्हाण (वय, 40) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होते. सुरेश चव्हाण हे मुंब्रा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. चव्हाण यांनी आत्महत्या का केली? याचा पोलीस तपास करीत आहेत. तसेच घटनास्थळी पोलिसांनी कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.