सायबर फसवणूक (Cyber Fraud) करणाऱ्यांनी मुंबईतील एका 33 वर्षीय व्यक्तीला छोटे कर्ज (Loan) देऊन लक्ष्य केले. त्याच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर असलेल्यांना त्याच्या फोटोंसह मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ (Pornographic video) प्रसारित केला. जेव्हा तो व्यक्ती रक्कम परत करण्यात अयशस्वी ठरला, असे पोलिसांनी सांगितले. हा व्हिडिओ महिलांनाही पाठवण्यात आल्याने पोलिसांनी अश्लील मजकूर पाठवल्याबद्दल आणि लैंगिक छळ केल्याबद्दल भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. फिर्यादीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी ऑनलाइन व्यवहार करून सात हजार रुपयांचे कर्ज घेतले.
कर्जासाठी कागदपत्रे सादर करताना, त्याने त्याच्या फोनवरील संपर्क यादीमध्ये प्रवेश मंजूर केला. जेव्हा तो पैसे परत करण्यात अयशस्वी ठरला तेव्हा रिकव्हरी एजंट्सनी त्याची छायाचित्रे एका अश्लील व्हिडिओमध्ये मॉर्फ केली. ती त्याच्या अनेक संपर्कांना पाठवली, तो म्हणाला. तक्रारदाराने सांगितले की हा व्हिडिओ त्याच्या कुटुंबातील आणि मित्रांमधील 12 हून अधिक लोकांना पाठवण्यात आला होता, ज्यात चार महिलांचा समावेश होता. हेही वाचा ED Action On Xiaomi: शिओमी कंपनीला ईडीचा धक्का 5,551 कोटी रुपयांची संपत्ती जप्त
त्यानंतर त्याने वसई-विरार परिसरातील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. जिथे तो राहतो, परंतु त्याला मुंबई सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले. कारण त्याने दादर रेल्वे स्टेशनवर असताना कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती.