Raj Thackeray, Sharad Pawar (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रवादीच्या (NCP) उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे असा संघर्ष सुरु झाला आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. "राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

शरद पवार यांची नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या जातीपातीच्या राजकारणाच्या आरोपाबाबत प्रश्न विचारला. यावर शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर न बोललेले बरे. त्यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. हे देखील वाचा- Maharashtra: महिला तलाठी यांनी लावला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप, चित्रा वाघ यांनी ट्विट केला 'हा' व्हिडिओ

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी गुरुवारी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखातीत त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू झाले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.

याआधी राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही राज ठाकरे यांच्या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली होती. राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केल्याचा टोला त्यांनी लगावला होता.