शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला; ‘पीएम नरेंद्र मोदींवर टीका करणे थांबवा आणि पक्षाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा’
शरद पवार (Photo credit : Youtube)

कॉंग्रेस (Congress) सोबत दीर्घकाळ राजकीय रिंगणात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी बुधवारी सीएनएन न्यूज 18 शी खास संवाद साधला. या दरम्यान त्यांनी कॉंग्रेसविषयीचे आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले की गांधीवाद ही कॉंग्रेसची मजबूत शक्ती आहे. यासह त्यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सल्लाही दिला. ते म्हणाले, ' राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधणे थांबवले पाहिजे. कॉंग्रेसची सत्ता हाती घेण्याची हीच वेळ आहे.' शरद पवार यांनी सांगितले की, राहुल गांधींनी कॉंग्रेस पक्षाची सत्ता हाती घ्यावी आणि देशभर प्रवास करावा.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘मी बऱ्याच वर्षांपासून कॉंग्रेसला पाहिले आहे आणि मी एक गोष्ट नोंदविली आहे. कुणीही हे मान्य करा किंवा न माना, गांधीवाद ही कॉंग्रेसची मजबूत शक्ती आहे. कॉंग्रेसला सोबत आणण्यात सोनियाजी यशस्वी ठरल्या. आता कॉंग्रेसवाल्यांनी राहुल गांधींना स्वीकारले आहे. ही त्यांची अंतर्गत बाब आहे आणि ते पक्षाच्या रँक आणि फाइलवर अवलंबून आहे. पण मला वाटते या सर्व लोकांनी पक्षाची संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींकडे सोपविली पाहिजे.’

शरद पवार पुढे म्हणाले, ‘राहुल गांधींनी पक्षाचा कारभार स्वीकारणे महत्त्वाचे आहेच, परंतु पक्षाच्या विविध नेत्यांशी चर्चा करणे देखील आवश्यक आहे. राहुल यांनी सर्व नेत्यांशी बोलले पाहिजे, त्यांना एकत्र आणले पाहिजे. राहुल यांनी देशाच्या दौर्‍यास सुरवात केली पाहिजे. त्यांनी प्रवास करावा, पक्ष कार्यकर्त्यांना भेटायला पाहिजे. काही काळापूर्वी त्यांनी हे केले होते व आता त्यांनी पुन्हा ते सुरू केले पाहिजे. कार्यकर्त्यांना एकत्रित करणे महत्वाचे आहे.’

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींवर सातत्याने केलेल्या हल्ल्याबद्दल विचारले असता, पवार म्हणाले. ‘त्यांनी तसे टाळले पाहिजे. आम्ही पाहिले आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस वैयक्तिकरित्या लक्ष्य करता तेव्हा आपली विश्वासार्हता कमी होते.’

ऑपरेशन लोटस संदर्भात पवार म्हणाले, ' महाराष्ट्रातही असेच प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आम्हाला महाराष्ट्रात सरकारला अस्थिर करायचे नाही. पण यासाठी सर्व स्तरातूनच प्रयत्न चालू आहेत- अगदी भारत सरकारपासून ते विरोधी पक्षापर्यंत सर्वजण राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांना यश आले नाही.' (हेही वाचा: आमदार रोहित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा, 'महाविकासआघाडीत घ्या, म्हणत शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!')

नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार यांनीही भारतीय जनता पक्षावर (BJP), महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला असल्याचे पवार यांनी सांगितले. शरद पवार यांचा राष्ट्रवादी महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारमधील भागीदार आहे. कॉंग्रेस देखील राज्य सरकारच्या युतीमध्ये सामील आहे.