प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीचे उड्डाणे बंद झाली आहेत. त्याचसोबत कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटाला सामोरे जात असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि कंपनी पुन्हा सुरु होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हस्तक्षेप करावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल इंडिया जेट एअरवेजचे ऑफिसर्स आणि स्टाफ असोसिएशन अध्यक्ष किरण पावसकर यांनी शरद पवार यांना पत्र लिहून जेटच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावा यासाठी मदत मागितली आहे. त्याचसोबत कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. परंतु जेटचे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत नोकरीस जाण्यास ठरविले तरीही रोजगाराची संधी कमी आहे. तर जेट एअरवेजच्या तुलनेत अन्य कंपन्या कमी वेतन देत असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-Jet Airways: जेट एअरवेज सिनिअर टेक्नीशियन शैलेश सिंह यांची आत्महत्या, पालघर येथील नालासोपारा परिसरातील घटना)

 त्यामुळे सरकारने या कर्मचाऱ्यांचा प्रश्नाकडे गंभीरित्या पाहावे असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीसुद्धा असे म्हटले आहे की, सरकारने या बद्दल ठोस भुमिका घ्यावी. तर शरद पवार यांनी मोदींना लिहिलेल्या पत्राद्वारे पुढील कारवाई होईल अशी आशा बाळगली जात असल्याचे पावसकर यांनी म्हटले आहे.