Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sharad Pawar Vs. Chhagan Bhujbal: नाशिक (Nashik) जिल्ह्यात आज राजकीय घमासाना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (8 जुलै) छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा (Sharad Pawar Yeola Sabha) घेत आहेत. दुसऱ्या बाजूला स्वत: छगन भुजबळ आज नाशिकला रवाना होत आहेत. त्यामुळे दोन्ही मातब्बर नेते हे एकाच ठिकाणी आल्यामुळे राजकीय वर्तुळाच मोठ्या प्रमाणावर हालचाल पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांच्यापासून फारकत घेत वेगळी वाट धरली. त्यानंतर ते प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. तर, शरद पवार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच, बंडानंतरची पवार यांची ही पहिलीच सभा आहे.

शरद पवार यांचा ताफा आज सकाळीच नाशिककडे रवाना झाला. या वेळी ठाणे येथे शरद पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ठाणे येथील आनंद नगर टोलकनाका परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पवार यांच्या ताफ्यात इथले अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. ते पुढे येवल्याच्या दिशेने रवाना झाले. दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार येवला येथे पोहचण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Sharad Pawar On Ajit Pawar: 'ना थकलो आहे न निवृत्त झालोय'; अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाक्याचा पुनरुच्चार करत शरद पवारांनी दिलं अजित पवारांना दिलं उत्तर)

दरम्यान, छगन भुजबळ यांनीही अचूक वेळ साधत आजच नाशिक भेटीचा कार्यक्रम आखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या सभेनंतर छगन भुजबळ सुद्धा प्रथमच आपले होमग्राऊंड असलेल्या नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहेत. छगन भुजबळ शक्तीप्रदरेशन करत ते मुंबईपासून नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. हा प्रवास ते ठाणे, शहापूर, इगतपुरी आणि पातर्डी फाटा मार्गे करत आहेत. त्यांचे कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत होत आहे.

व्हिडिओ

छगन भुजबळ हे मुळचे शिवसेना पक्षातले. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्यांना मुंबईचा नगरसेवक आणि पुढे महापौर होण्याची संधी मिळाली. याच भुजबळांना पुढे शिवसेनेत आमदार म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, भुजबळ यांनी मंडल आयोगावरुन बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याचे सांगत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. पुढे अनेक वर्षे ते शरद पवार यांचे कट्टर म्हणून वावरले मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी शरद पवार यांची साध सोडत अजित पवार यांच्यासोबत बंड केले. आज तेच पवार नाशिकमध्ये परतत आहेत.