Sharad Pawar on Eknath Khadse: नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढेल, यात माझ्या मनात काहीही शंका नाही- शरद पवार
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच जळगावात भाजपा मोठा होण्यामागे एकनाथ खडसे यांची अधिक मेहनत होती. मात्र, त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असेही ते म्हणाले आहेत.

मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यात खडसे यांचे धडाकेबाज भाषण झाले. यावेळी खडसे यांनी भाजपच्या बदललेल्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. आयुष्यातली 40 वर्षे मी भाजपची सेवा केली आहे. यामुळे एकाएकी पक्ष सोडावा वाटला नाही. परंतु, पक्षात असताना माझा छळ करण्यात आला. मी आजपर्यंत खूप संघर्ष केला आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले की, एक काळ असा होता की जळगाव जिल्हाही राष्ट्रवादी विचारांचा होता. मात्र, हा विचार नंतर मागे पडला. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली. जळगावात भाजपा मोठा होण्यामागे एकनाथ खडसे यांची मेहनत होती. मात्र, त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. नाथाभाऊ आता आपल्या पक्षात आले आहेत. हे देखील वाचा- Package For Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलेल्या 10 हजार कोटींच्या मदत पॅकेजचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत

एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्राथमिक सदस्यांचा राजीनामा देत बाहेर पडलेल्या माळी समाजाचे ओबीसी नेते एकनाथ खडसे समर्थक अनिल महाजन यांचा जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे प्रवेश समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या यांच्या हस्ते अनिल महाजन यांना प्रवेश देण्यात आला आहे.