Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात पाठीमागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ब्राह्मण (Brahmin Society) विरोधी असल्याची टीका केली जात आहे. खास करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश ब्राह्मण नेत्यांनीही शरद पवार यांच्यावर ब्राह्मण विरोधी असल्याची टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण (Sharad Pawar Invites Brahmin Association) देण्यात आले आहे. दरम्यान, ब्राह्मण महासंघ ही एकमेव संघटना वगळता बाकिच्या ब्राह्मण संघटनांनी चर्चेची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे.

शरद पवार यांच्याविषयी खास करुन सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणावर टीका, मतं केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि ब्राह्मण संघटनांच्या रुपात समाज यांच्यात विविध विषयांवर चर्चा होईल. एकमेकांची मतं जाणून घेता येतील. शिवाय काही मतभेद असतील तर तेही दूर केले जातील, असे सांगितले जात आहे. पाठिमागील काही दिवसांचा विचार करता खास करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार हे जातीयवादी आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राह्मण आहेत म्हणूनच त्यांना त्यांच्या उतारवयात राष्ट्रवादीने त्रास दिला असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर हाच धागा पकडत मग इतरही काही ब्राह्मण नेत्यांनी शरद पवार यांच्यावीर टीका करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पनवेलमधून फूड स्टॉल मालकाला अटक)

दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीचे निमंत्रण नाकारणाऱ्या ब्राह्मण महासंघाने म्हटले आहे की, छगन भुजबळ, अमोल मिटकरी यांच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी पाठीमागील काही दिवसांमध्ये जाहीर सभातून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले आहे. ब्राह्मण समाज बहुजनांना वेद शिकवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपासह राष्ट्रवादीचे इतरही नेते सातत्याने ब्राह्मण समाजाविरोधात विधाने करत आहेत. व्यासपीठावरुन शरद पवार हे देखील त्याला मूख संमती दर्शवत आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या विधानाबद्दल शरद पवार यांनी आगोदर भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची मागणी असल्याचे ब्राह्मण महासंघाचे म्हणने आहे.