सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. आज पासून तीन भागांमध्ये शरद पवारांची ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहेत. यामध्ये लॉकडाऊन, कोरोनाची परिस्थिती ते महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष याबद्दल शरद पवारांनी उत्तरं दिली आहेत. दरम्यान लॉकडाऊन पासून ते अगदी महाविकास आघाडीमधील निर्णयांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याची टीका वारंवार होत आहे. त्याला या मुलाखतीमध्ये उत्तर देण्यात आलं आहे. दरम्यान लॉकडाऊन हा कोरोनाला आटोक्यात ठेवण्यासाठी गरजेचा होता अन्यथा आपली परिस्थिती अमेरिकेतील न्युयॉर्क प्रमाणे होऊन हाताबाहेर गेली असती असं सांगत शरद पवार यांनी सुरूवातीच्या कठोर लॉकडाऊनचं समर्थनच केले आहे.
दरम्यान महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाची भमिका बजावत असलेले शरद पवार या आघाडीमध्ये हेडमास्तर आहेत की रिमोट कंट्रोल यावरदेखील खुमासदार उत्तर दिले आहे. शरद पवार म्हणतात, लोकशाहीचे सरकार हे रिमोट कंट्रोलने चालू शकत नाही. महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ चालवत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या 'एक शरद, सगळे गारद…!
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीमधील फरक देखील शरद पवार यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपी- भाजपा युती होण्याची शक्यता होती हे बोलून दाखवले होते. तसेच शिवसेनेने भाजपाची साथ सोडली असं म्हटलं होतं. मात्र आज शरद पवार यांनी महाराष्ट्रात भाजपाच्या 105 विधानसभेच्या जागांमध्ये शिवसेनेची देखील महत्त्वाची भूमिका होती. शिवसेना नसती तर ते राज्यात 40-50 च्या आसपास राहिले असते असे देखील शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातलं सत्तांतर हा अपघात नव्हता. लोकांना बदल हवा होता.
शरद पवारांची मॅरोथॉन मुलाखत उद्या आणि परवा सामना मध्ये प्रसिद्ध आणि टेलिव्हिजनवर देखील प्रकाशित होणार आहे.
दरम्यान विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मीडियाशी बोलताना संजय राऊत यांच्या 'एक शरद, सगळे गारद…' यावरून टीका केली होती. एक नारद सगळे गारद म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला होता.