Sharad Pawar (Photo Credits-ANI)

एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना मागील 2 दोन दिवसांपासून पित्ताशयाचा त्रास सुरू असल्याने त्यांनी सारे कार्यक्रम रद्द करून आराम करण्याचा निर्णय घेतला होता. पण काल पोटदुखीचा त्रास अधिकच जाणवू लागल्याने उशिरा त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये एक लहानशी शस्त्रक्रिया पार पडली आहे. पित्ताशयाच्या खड्यांचा (Gallbladde Stones) त्रास होत असल्याने तो खडा काढण्यात आला आहे आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या आजारात काही गुंतागुंत अजूनही आहे मात्र त्याची देखील शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढून टाकण्याबाबत मात्र येत्या काही दिवसांत त्यांची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असेल ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलचे (Breach Candy Hospital) डॉक्टर अमित मायदेव (Amit Maydeo) यांनी म्हटले आहे. Gallbladder च्या त्रासामुळे शरद पवार रुग्णालयात दाखल; नेमका काय आहे हा आजार? जाणून घ्या.

दरम्यान पित्ताशयामध्ये होणार्‍या खड्यांना लॅप्रोस्कॉपीच्या माध्यमातून काढले जाते. यामध्ये कमीत कमी चिरफाड आणि रक्तस्त्राव होतो. त्यानुसार पित्ताशयाचा खडा काढण्यात येतो. मात्र मायदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत आणि त्यांचं पित्ताशय काढून टाकायचं की नाही याचा निर्णय पुढील काही दिवसांत घेतला जाणार आहे.

ANI  Tweet

शरद पवार यांच्यावरील पहिल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडीयात डॉक्टरांसोबतचा एक फोटो टाकून आभार मानले आहेत. यावेळी हॉस्पिटल मध्ये एनसीपी आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. रात्री उशिरा आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील हॉस्पिटल मध्ये होते.