'अजित पवार यांना शरद पवार यांनी माफ केलंय'- नवाब मलिक
Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी (ShivSena NCP-Congress) तिन्ही पक्ष एकत्र येऊन यांनी राज्याला नवे सरकार दिले आहे. महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्णी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते तर, अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, असे शरद पवार त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर अजित पवार पुन्हा पक्षात आले असून त्यांनी चूक झाल्याचे मान्य केली आहे. तसेच शरद पवार यांनी त्यांना माफही केले आहे, अशी माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली.

अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळणी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला होता. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर राजकीय वातावरणात मोठा बदल घडून आला होता. परंतु, भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी 80 तासांनंतर पदाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले. यावर नवाब मिलिक यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'अजित पवार यांनी सरतेशेवटी आपली चूक कबूल केली आहे. हे त्यांचे कौटुंबिक प्रकरण आहे आणि शरद पवार यांनी त्यांना माफ सुद्धा केले आहे. अजित पवार यांचे पक्षातील स्थान बदलण्यात आलेले नाही, ते कायम राहील,' असे मलिक यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा-उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला सोनिया गांधी, राहुल गांधी, राज ठाकरे यांच्यासह या दिग्गज नेत्यांना दिले आमंत्रण

नुकतीच पार पडलेल्या बैठकीत महाविकासआघाडीने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव हे ठाकरे कुटुंबियातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. तसेच हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.