Sharad Pawar | (Photo Credit: Facebook)

Sharad Pawar Facebook Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह (Facebook Live) माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोविड 19 (COVID-19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर उभ्या ठाकलेल्या महाभयानक आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा अनेक आव्हानांबाबत Sharad Pawar या फेसबुक (Facebook) पेजवरुन शरद पवार हा संवाद साधणार आहेत. आज सकाळी 11 वाजता हा संवाद सुरु होणार आहे.

जगभराप्रमाणेच कोरोना व्हायरस हा भारत आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात आव्हान बणून राहिला आहे. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री हे प्रसारमाध्यमांमधून वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. तसेच, कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी राज्य नेमक्या काय उपाययोजना करत आहे याबाबतही माहिती देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा देशातील जनतेला संबोधित करुन केंद्राच्या भूमिकेबद्दल सांगत आहेत. (हेही वाचा, Coronavirus चा सामना करण्यासाठी NCP ने घेतला महत्वाचा निर्णय; आमदार व खासदारांना ताबडतोब अंमलबजावणी करण्याचे शरद पवार यांचे आदेश)

दरम्यान, राज्यातील जनतेच्या मनात कोरोना व्हायरसने चांगलीच भीती निर्माण केली आहे. त्यामुळे घाबरुन जाऊन अनेक लोक काहीही करत सुटले आहेत. तर, काही कोरोना संकटाचे आपल्याशी काहीही देणंघेणं नाही, असं सांगत गर्दी करत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रभावी व्यक्तिमत्वांनी पुढे येऊन जनप्रबोधन करणे आवश्यक बणले आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांकडून जनसंवाद केला जात आहे. शरद पवार फेसबुक लाईव्ह स्ट्रिमिंग आपण इथे पाहू शकता.

शरद पवार फेसबुक पोस्ट

ताज्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत 694 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 43 लोक यातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आणि देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्ण बरे होत असले तरी, धोका टळला नाही. नव्याने कोरना बाधित झालेल्या रुग्णांचीही संख्या वारंवार वाढतेच आहे. आता तर ग्रामिण भागातही कोरोना व्हायरस बाधित रुग्ण सापडू लागल्याने मोठेच आव्हान निर्माण झाले आहे.