बिरारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनुक्रमे नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यादव यांनी आज (11मे) शिवसेना (UBT) उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची वेगवेगळी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी वेगवेगळ्या संयुक्त पक्षकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. या वेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला की, आगामी काळात शरत पवार हे विरोधी आघाडीचे प्रमुख चेहरा असतील काय? पत्रकारांचा रोख शरद पवार यांच्याकडे असताना नितीश कुमार यांनी अचूक टायमींग साधले आणि दिलखुलास हसत थेट उत्तर दिले.
शरद पवार हे विरोधी आघाडीचा प्रमुख चेहरा असतील का? पत्रकाराच्या या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले की, यापेक्षा आनंददायक काहीही नसेल. मी त्यांना सांगितले आहे की, त्यांनी केवळ त्यांच्या पक्षासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठीही जोरदार काम केले पाहिजे. खरेततर त्यांनी काम करणे हे देशासाठीही आनंदाचा क्षण असेल. दरम्यान, शरद पवार यांनी मात्र, सांगितले की, चेहरा वगैरे अजून काही ठरले नाही. परतू, लोकांसाठी एकत्र येऊन काम करायचे आहे. चेहरा नंतर ठरवू. (हेही वाचा, 'सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निर्णय' - उद्धव ठाकरे यांनी दिली सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया)
दरम्यान, नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा पूर्ण तपशील बाहेर आला नसला तरी संयुक्त पत्रकार परिषदेत मात्र आपण देश, देशाली लोक आणि घटनेच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन काम करु असे म्हटले.
व्हिडिओ
#WATCH | When asked if Sharad Pawar will be the main face of the Opposition alliance, Bihar CM Nitish Kumar says, "There will be nothing more delightful than that...I have told him that he has to work strongly not only for his party but the entire country."
Sharad Pawar says,… pic.twitter.com/pIsludqmbj
— ANI (@ANI) May 11, 2023
नितीश कुमार हे एक प्रमुख राजकारणी आहेत. जनता दल (युनायटेड) पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांनी अनेकवेळा बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 1 मार्च 1951 रोजी बिहारमधील बख्तियारपूर येथे जन्मलेल्या नितीश कुमार यांची राज्यात दीर्घ आणि प्रभावशाली राजकीय कारकीर्द आहे. नितीश कुमार 2000 मध्ये पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांचा कार्यकाळ केवळ आठवडाभरच राहिला. जनता दल (युनायटेड) ने भारतीय जनता पार्टी (भाजप) सोबत युती केल्यानंतर 2005 मध्ये त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. 2010 आणि 2015 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ कायम ठेवत पुन्हा निवडणूक जिंकली. नितीश कुमार यांनी 2017 मध्ये थोडक्यात भाजपसोबतची युती तोडली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबत आघाडी सरकार स्थापन केले. तथापि, त्यांनी जुलै 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि भाजपसोबत युती करून पुन्हा मुख्यमंत्री बनले.