Sexual harassment Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

Woman Pilot Sexual Harassment During Uber Rride: मुंबईत रात्री उशिरा उबर प्रवासादरम्यान (Uber Rride) एका 28 वर्षीय महिला पायलटचा लैंगिक छळ (Sexual Harassment of Female Pilot) करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कॅब चालक आणि दोन अनोळखी पुरूषांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री 11:15 च्या सुमारास घडली. यावेळी पीडित महिला दक्षिण मुंबईतील एका डिनर आउटिंगवरून घाटकोपर येथील तिच्या घरी परतत होती. अधिकृत निवासस्थानाच्या अभावामुळे सध्या नौदलाच्या निवासी संकुलात राहणाऱ्या तिच्या पतीने तिच्यासाठी कॅब बुक केली होती.

महिलेच्या तक्रारीनुसार, प्रवासाच्या सुमारे 25 मिनिटांनी, कॅब चालकाने मार्ग बदलला. त्यानंतर त्याने कारमध्ये दोन पुरुष प्रवाशांना बसवले. त्यातील एक पुरूष तिच्या शेजारी मागच्या सीटवर बसला आणि त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तिने विरोध केला तेव्हा त्याने तिला धमकावले. तसेच यावर चालकाने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तथापी, त्याने कोणताही हस्तक्षेप केला नाही. (हेही वाचा -Hyderabad Rape Case: मॅट्रिमोनियल साइटवर लग्नाचे आमिष दाखवून हैदराबादमधील महिलेवर बलात्कार; 25 लाख रुपयेही उकळले)

दरम्यान, रस्त्यावर पोलिस चेकपोस्ट पाहून दोघे पुरूष पळून गेले. त्यानंतर महिला सुरक्षितपणे घरी पोहोचली. तसेच महिलेने चालकाला त्या पुरूषांना गाडीत का येऊ दिले? असे विचारले असता चालकाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. (हेही वाचा - Minor Girls Molested By Watchman In Parel: परळमध्ये वॉचमनचा 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपीला अटक)

या सर्व प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, महिलेने आणि तिच्या पतीने घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 75(1) (लैंगिक छळ), 351(2) (गुन्हेगारी धमकी) आणि 3(5) (सामान्य हेतू) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.