Minor Girls Molested By Watchman In Parel: परळमध्ये वॉचमनचा 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपीला अटक

पीडित मुलींनी त्यांच्या पालकांना छेडछाडीची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेनेनंतर पीडित मुलींच्या आईने तात्काळ भोईवाडा पोलिस ठाण्यात जाऊन औपचारिक तक्रार दाखल केली. तथापि, पोलिसांनी गुरुवारी सकाळी आरोपीला अटक केली.

Minor Girls Molested By Watchman In Parel: परळमध्ये वॉचमनचा 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपीला अटक
Molestation | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Minor Girls Molested By Watchman In Parel: मुंबईतून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. परळ परिसरातील एका निवासी इमारतीतील तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली भोईवाडा पोलिसांनी एका चौकीदाराला अटक केली आहे.11 जून रोजी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने सोसायटीतील 11 वर्षांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली. पीडित मुलींनी त्यांच्या पालकांना छेडछाडीची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेनेनंतर पीडित मुलींच्या आईने तात्काळ भोईवाडा पोलिस ठाण्यात जाऊन औपचारिक तक्रार दाखल केली. तथापि, पोलिसांनी गुरुवारी सकाळी आरोपीला अटक केली.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा, 2012 आणि अनेक संबंधित कलमांसह विविध कायदेशीर तरतुदींनुसार आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तथापि, मुंबईतील दुसऱ्या एका घटनेत कांदिवलीमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी एका 59 वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा - Goa Rape Case: ईद पार्टीसाठी हॉटेलमध्ये बोलावून 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)

59 वर्षीय सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार -

कांदिवलीमध्ये एका 59 वर्षीय सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. एका 30 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई केली. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, कांदिवली येथे राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या मुलीला पाच वर्षांची मुलगी आहे. 25 मे रोजी, मुलगी तिच्या घराजवळ खेळत असताना, सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे येऊन तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा - Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल)

तथापि, काही दिवसांनी पुन्हा आरोपीने मुलीसोबत पहिल्यासारखेचं कृत्य केले. दोन्ही घटनांबद्दल आईला कळताच तिने ताबडतोब समता नगर पोलिसांना ही बाब कळवली आणि चौकीदाराविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).