Hyderabad Rape Case: मॅट्रिमोनियल साइटवर लग्नाचे आमिष दाखवून हैदराबादमधील महिलेवर बलात्कार; 25 लाख रुपयेही उकळले
शशिकांत कक्कड असे या आरोपीचे नाव आहे. पीजित महिलेशी फेसबुकवर मैत्री करण्यापूर्वी ओरोपी एका वैवाहिक वेबसाइटवर (Matrimonial Site) महिलेला भेटला होता.
Hyderabad Rape Case: हैदराबादमधून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 47 वर्षीय महिलेवर मुंबईतील एका पुरूषाने बलात्कार (Rape) करून 25 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शशिकांत कक्कड असे या आरोपीचे नाव आहे. पीजित महिलेशी फेसबुकवर मैत्री करण्यापूर्वी ओरोपी एका वैवाहिक वेबसाइटवर (Matrimonial Site) महिलेला भेटला होता. बेगमपेट पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही नियमितपणे बोलू लागले आणि त्यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले.
तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार, जानेवारी 2023 मध्ये शशिकांत हैदराबादला आला आणि एका आलिशान हॉटेलमध्ये राहिला. त्याच्या वास्तव्यादरम्यान, तो त्या महिलेला अनेक वेळा भेटला. त्याने श्रीमंत पार्श्वभूमीचा असल्याचा दावा केला आणि तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. या काळात आरोपीने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तिने पुढे सांगितले की शशिकांतने तिच्या बहिणीच्या बँक खात्याचा वापर करून तिला आणि तिच्या कुटुंबाला शेअर बाजारात सुमारे 25 लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. पैसे मिळाल्यानंतर तो मुंबईत परतला आणि तिला टाळू लागला. (हेही वाचा - Minor Girls Molested By Watchman In Parel: परळमध्ये वॉचमनचा 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपीला अटक)
दरम्यान, नंतर जेव्हा महिलेने त्याला लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने तिच्यासोबत लग्नास नकार दिला. तथापि, पीडित महिलेने असाही दावा केला आहे की, जर तिने त्याला संपर्क साधला किंवा लग्नाची मागणी केली तर तो तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करेल. पीडितेच्या तक्रारीवरून बेगमपेट पोलिसांनी शशिकांतविरुद्ध फसवणूक, बलात्काराचा गुन्हा दाखल केला. (हेही वाचा - Goa Rape Case: ईद पार्टीसाठी हॉटेलमध्ये बोलावून 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)
वर्क फ्रॉम हॉमच्या नावाखाली अंधेरीतील महिलेची 15 लाख रुपयांची फसवणूक
मुंबईतील दुसऱ्या एका घटनेत अंधेरी येथील 22 वर्षीय महिलेला घरातून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिची 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तिच्या कामाचे पैसे मिळण्याऐवजी तिला धमकावून पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

