
Thane Crime: ठाणे येथील कळवा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे एका ११ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४२ वर्षीय व्यक्तीला अटक केले आहे. दरम्यान बदलापूर येथे एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थींनीचा लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. या घटना संतप्त नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरु केले आहे. (हेही वाचा- बदलापूरमध्ये शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा शाळेच्या गेटवर मोर्चा)
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीने ११ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केला. रुग्णालयाच्या बागेत मुलगी खेळत होती. त्यावेळी अज्ञात व्यक्ती तीच्या जवळ आला आणि तीला अयोग्यरित्या स्पर्श करू लागला. मुलीने तात्काळतेने आरडाओरड सुरु केला. गोंधळ ऐकून रुग्णालयातीला सुरक्षा रक्षकाने घटनास्थळी धाव घेतला.
आरोपीचे नाव प्रदीस शेळके असं आहे. सुरक्षा रक्षकाने आरोपीला पकडले. पोलिसांना या बद्दल माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आले त्यावेळी सुरक्षारक्षकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली त्यावेळीस त्याने मुलीचा काका असल्याचे सांगितले. पंरतु तिने ओळखत नसल्याचे नाकारले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.