गतीमंद महिलेवर (Disabled Woman) लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशियित आरोपीने कारागृहातच आत्महत्या (Sucide) करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पंढरपूर (Pandhpur) येथे घडली. स्थानिक पोलिसांनी संशयित आरोपीला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय आरोपीने पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होत आहे.
अर्जुन शितोळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. अर्जुन याने एका मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पंढरपूर स्थानिक पोलिसानी गेल्या काही दिवसापूर्वी अटक केली होती. मात्र आज पहाटे 2 वाजताच्या सुमारास आरोपी अर्जुन शितोळेने पोलीस ठाण्यातच टॉवेलच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे उपस्थितीत आलेल्या पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांनी धाव घेऊन फासातून त्याची सुटका केली. त्यानंतर त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अर्जुन याची प्रकृती चिंताजनक आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! मुंबई येथील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ
या प्रकरणी संशयित आरोपी शितोळेवर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधेयक कलम 376 आणि अट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल झाला होता. अर्जुन शितोळे न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.