मुंबई (Mumbai)येथील अंधेरीतील ( Andhri)परिसरात सेक्स रॅकेटचा (Sex Racket) मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून 3 तरुणींची यातून सुटका केली आहे. त्यापैकी 2 तरुणी पुणे विद्यापिठातील (Pune University) विद्यार्थिंनी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या साथीदार महिलेचा शोध घेतला जात आहे. संबंधित विद्यार्थिनींची फसवणूक करुन त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यामुळे आजूबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे.
नावेद अख्तर आणि नाविद सय्यद या दोन्ही दलालांना अटक केली असून यांच्यात टोळीत एका महिलेचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी महिला फरार झाली असून मुंबई पोलीस तिचा शोध घेत आहेत. वर्सोवा येथील एका फ्लॅटमध्ये या तरुणींना ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रत्येक मुलीच्या बदल्यात 40 हजार रुपये घेत होते. हे देखील वाचा-बॉलिवुड च्या प्रसिद्ध निर्मिती व्यवस्थापकाला जुहू येथे सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेट मधील संबंधातून अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील 3 तरुणींपैकी दोघीजणी तुर्कमेनिस्तानच्या रहिवासी आहेत. तर, एक भारतीय आहेत. दोन्ही तरुणी स्टुडंट व्हिसावर पुणे विद्यापीठात शिक्षण घेत होत्या. मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी सेक्स रॅकेटवर कारवाई करत दोघींची मुक्तता केली.