Sex Racket (Photo Credits- Twitter)

मुंबई (Mumbai) उपनगरातील उच्चभ्रू अशा जुहू (Juhu) परिसरात हॉटेल झेड लक्जरी रेसिडेन्सी हॉटेल (Z Luxury Residency Hotel) मध्ये शुक्रवारी, 3  जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी धाड टाकून एका सेक्स रॅकेट (Sex Racket) चा पर्दाफाश केला, यामध्ये बॉलिवूड मधील प्रसिद्ध निर्मिती व्यवस्थापक राजेश कुमार लाल (Rajesh Kumar Lal) यांचा संबंधांचे धागेदोरे आढळल्याने त्याच्या विरुद्ध तपास सुरु होता, अखेरीस आज, म्हणजे शनिवारी, 4 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी राजेश कुमार याला अटक केली आहे. सोबतच या रॅकेट मधून दोन उझबेकिस्तान (Uzbekistan) च्या नागरिकांची सुटका करण्यात देखील पोलिसांना यश आले आहे. या पूर्वी 23 डिसेंबर रोजी देखील याच हॉटेल मधून मुंबई पोलिसांनी तीन जणांची सुटका केली होती.

प्राप्त माहितीनुसार, झेड लक्जरी रेसिडेन्सी हॉटेल मध्ये उझबेकिस्तान मधील झरीना नामक महिला ही राजेश कुमार यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत होती. परदेशी महिलांना ही झरीना वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये प्रति कस्टमर 80 हजार रुपये चार्ज करून पाठवत असे. याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी विशेष पालन आखून हा प्रकार समोर आणला. या दोघांनाही आता पोलिसांकडून अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केलेला आहे..(Sex Racket: पुण्यात 2 हिंदी आणि मल्याळम अभिनेत्रींचा वेश्याव्यवसाय; ग्राहक बनून पोलिसांचा छापा, डॉक्टर दलाल अटकेत)

दरम्यान, मागील महिन्यात कुलाबा येथे एका हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेट सुद्धा अशाचा पद्धतीने उघड झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. तर त्याआधी, प्रभादेवी येथील सिद्धीविनियाक होरीझॉन या इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याचे समोर आले होते. यातही पोलिसांनी घटनास्थळी छापेमारी करत 9 तरुणींची सुटका केली होती.