Sex Marriage Promise: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, हायकर्टाने फेटाळला विवाहीत पुरुषाचा जामीन अर्ज
Anticipatory Bail | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Mumbai News Today: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) भारतीय वायू सेनेत (IAF) सेवेत असलेल्या एका ऑटोमोबाईल टेक्निशियन असलेल्या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) फेटाळून लावला आहे. त्याच्यावर लग्नाचे आमिष (Sex Marriage Promise) दाखवून बलात्कार (Rape) केलेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह ठरला होता. मात्र, असे असतानाही आरोपीने पीडितेला विवाहाचे आमिष दाखवले आणि हे संबंध प्रस्तापीत केल्याचा आरोप आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश मकरंद कर्णिक यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावताना म्हटले की, वस्तूस्थिती आणि पुरावे पाहता आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावणेच योग्य आहे. कोर्टाने आपल्या 17 जानेवारीच्या आदेशात आरोपीला पोलिसांपुढे येत्या 2 फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.

मॅट्रीमोनी साइटवर ओळख

नौपाडा पोलिसांनी आरोपीविरोधात प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त तक्रारीनुसार, सातारा येथील आरोपीवर बलात्कार आणि फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जुलै 2022 मध्ये दाखल झाला. आरोपी आणि पीडिता परस्परांना ओळखत होते. तसेच, दोघांमध्ये मैत्रीचे नाते होते. दोघांमध्ये मॅट्रीमोनीअल साईट्सवरुन ओळख झाली. या ओळखीतून ते 18 मार्च 2022 मध्ये पहिल्यांदा भेटले. आरोपीने महिलेला स्वत:सोबत गोव्याला येण्यासाठी राजी केले. गोव्यासोबतच ते इतरही काही ठिकाणी फिरले. आपण लग्न करणार आहोत. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचेही तो म्हणाला. (हेही वाचा, Health Benefits of Sex: लैंगिक संबंधांचे आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून)

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध

महिलेने तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून आपल्यासोबत लैंगिक संबंध प्रस्तापीत केले. इतकेच नव्हे तर या संबंधातून राहिलेली गर्भधारणाही आरोपीने बळजबरीने संपुष्टात आणली. त्यानंतर त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपण त्याला 19 जून 2022 रोजी त्याच्या कामाच्या ठिकाणी भेटायला गेलो. त्या वेळी तो असाममधील तेझपूर येथे नोकरीस होता. मात्र तेथे तो त्याच्या विवाहासाठी गावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ती त्याला प्रत्यक्ष भेटली तेव्हा आढळून आले की, तो खरोखरच विवाहबद्ध झाला होता. त्यानंतर तिने जाऊन पोलिसांमध्ये रितसर तक्रार दिली. (हेही वाचा, High Court On Lust Vs. Love: 'प्रेमातील शारीरिक संबंध वासना नव्हे', मुंबई हायकोर्टाकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर)

आरोपीविरोधात गेल्या जुलैमध्ये या व्यक्तीवर एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. महिलेचे वकील हरेकृष्ण मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी पुरुषाने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिने शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली. आरोपीचे वकील पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितले की, ते दोघे संमतीने नातेसंबंधात होते आणि हे शारीरिक संबंध लग्नाच्या खोट्या वचनामुळे निर्माण झाले की नाही याचा निर्णय खटल्यादरम्यान होऊ शकतो.