धक्कादायक! झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आपले जीवन संपवले
Hanging (Photo Credits: Representative Image)

आपल्या प्रेमाला विरोध होत असल्यामुळे प्रेमीयुगुलाने उपळीच्या शेतात अंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आपल्या मुलांची समजूत घालायची की नाही, असा प्रश्न पालक वर्गांच्यासमोर येऊन उभा राहिला आहे.

प्रदीप गजाजन पथवे (21) असे तरुणाचे तर, तेजल राजु मेंगाळ (19) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. तसेच या दोघांचे प्रेमसंबध होते. गेल्या 5 दिवसांपासून दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार राजूर पोलिसांत नोंदवली होती. परंतु, शनिवारी दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास एका ग्रामस्थाने प्रदीप आणि तेजल हिचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर ग्रामस्थांनी लगेच याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचाही मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- दिल्ली: TikTok स्टार आत्महत्या करण्यासाठी 18 तास हॉटेलच्या छतावर, 50 लाख युजर्स करतात फॉलो

सध्या प्रेमयुगुलाने आत्महत्या केल्याच्या अनेक बातम्या सतत आपल्या कानावर पडत असतात. तसेच अशा प्रकारच्या बातम्या बघून पालकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आपल्या पाल्यांना योग्य सल्ला देणेदेखील महागात पडू शकते, अशी भिती पालकवर्गाला वाटू लागली आहे.