Chhatrapati Sambhajinagar Nagar: छत्रपती संभाजीनगर घाटीतील एका नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या सत्रातील 19 विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग केल्याची घटना समोर आली आहे. रॅगिंगच्या नावावर ज्युनियर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे, याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने चौथ्या आणि पाचव्या सत्राच्या एकूण 11 विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित केले आहे. यासोबतच या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढल्याची माहितीही कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी चौथ्या आणि पाचव्या सत्रात शिकणाऱ्या सिनियर विद्यार्थ्यांनी 19 ज्युनियर विद्यार्थ्यांना वसतिगृहात बोलावून शिवीगाळ केली, तसेच त्यांना गाणी म्हणायला लावली आणि मारहाणही केली. यावेळी एका विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आदळल्याने त्याला दुखापत झाली. या जखमी विद्यार्थ्यावर उपचार केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. हे देखील वाचा: Mumbai Weather forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. अँटी रॅगिंग समितीने तपास केल्यानंतर त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला. या तपासणीत ज्युनिअर विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे उघड झाले. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयातही अशाच प्रकारची रॅगिंगची घटना उघडकीस आली होती.
थर्ड इयर एमबीबीएसचे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना चहा, कॉफी, सिगारेट आणायला सांगत. यानंतर एका विद्यार्थ्याने याबाबत पालकांकडे तक्रार केली. यानंतर त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली. त्यावेळी तीन ज्येष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करून २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता.