Prithviraj Chavan On Congress: काँग्रेसला ‘कठपुतली अध्यक्ष’ नसून रीतसर निवडून आलेल्या अध्यक्षाची गरज; पृथ्वीराज चव्हाण यांचा गांधी कुटुंबावर निशाणा
Prithviraj Chavan | (Photo Credits: Facebook)

Prithviraj Chavan On Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्षाला ‘कठपुतली अध्यक्ष’ नसून रीतसर निवडून आलेला अध्यक्षाची गरज आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, निवडून आलेल्या अध्यक्षांना आगामी संघटनात्मक निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडलेल्या नेत्यांनी पक्षाच्या कामकाजात मदत केली पाहिजे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला की, पक्षाने गेल्या 24 वर्षांपासून संघटनात्मक निवडणुका घेतल्या नाहीत. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाच्या राजीनाम्याबाबत विचारले असता चव्हाण यांनी सांगितलं की, या ज्येष्ठ राजकारण्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणं दुर्दैवी आहे. आझाद हे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि धर्मनिरपेक्ष चेहरा होते. (हेही वाचा - Ghulam Nabi Azad's Letter to Sonia Gandhi: राहुल गांधी यांच्यावर खापर फोडून 'आजाद' होण्यापूर्वी गुलाम यांचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र)

दरम्यान, 'G23' असंतुष्ट गटाचा भाग असलेल्या चव्हाण यांनी ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत अंतर्गत सुधारणा करण्याची मागणी केली होती. माजी केंद्रीय मंत्री आझाद हे 'G23' ब्लॉकचे प्रमुख सदस्य होते.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगला पर्याय न दिल्यास ती "ऐतिहासिक चूक" ठरेल. 2014 पासून केंद्रात सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेससाठी पक्षासाठी ही स्थिती कायम राहणे चांगले नाही, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.