PMPML Bus Stealing Diesel: पुणे महानगर परिवहन महामंडळ बसमधील डिझेल चोरी प्रकरणी सुरक्षा रक्षकाला अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML ) बसमधून इंधन (Diesel) चोरल्याच्या आरोपावरून पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) एका खासगी सुरक्षा रक्षकाला (Security guard) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख गणेश धनगर असून बिबवेवाडीमधील झांबरे वस्ती वास्तव्यास आहे. पीएमपीएमएलच्या सुरक्षा विभागाचे प्रभाग निरीक्षक अविनाश सोनवणे (Avinash Sonawane) यांनी मंगळवारी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) या प्रकरणी पहिला माहिती अहवाल दाखल केला आहे. हेही वाचा मुंबई पोलिसांकडून Sex Tourism Racket उधळलं; 2 जणांना अटक तर दोघांची सुटका

पोलिसांनी सांगितले की, आरोपी धनगवार मंगळवारी पहाटे 3.30 च्या सुमारास बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर येथील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या पीएमपीएमएल बसच्या इंधन टाकीतून डिझेल चोरत असल्याचे आढळून आले. त्याने 500 रुपये किमतीचे सुमारे 5 लिटर डिझेल डब्यातून काढले होते. भारतीय दंड संहितेच्या कलम 381 नुसार धनगरला अटक (Arrest) करण्यात आली आहे.