Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर; पक्षाकडून आतापर्यंत 72 उमेदवार रिंगणात
Raj Thackeray (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2019) तारखा जाहीर झाल्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर आता पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही (MNS) मोठ्या ताकदीनिशी उतरत आहे. अशात मनसेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोंकण, विदर्भ, मराठवाडा, आणि मुंबई मधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. मनसेच्या या यादीमध्येही वरळी मतदारसंघाचा समवेश नाही. त्यामुळे इथून आदित्य ठाकरेंसाठी मनसेने माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

मनसे ट्विट -

मनसे विधानसभा निवडणुका लढवणार का? याबाबत संभ्रम होता. मात्र सोमवारी मनसेचा मेळावा पार पडला, यामध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच 5 ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात होणार असल्याचीही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर मनसेने पहिल्या यादीमार्फत  27 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यानंतर आजच्या दुसऱ्या यादीमध्ये 45 उमेदवारांचा समावेश आहे. अशाप्रकारे मनसेने एकूण 72 उमेदवार जाहीर केले आहेत. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नाशिक, पुणे, मुंबईवर फोकस)

दरम्यान, सोमवारी मुंबई येथे पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यात राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विधानसभा 2019 निवडणूकीच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावरून मनसे मोठ्या ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.  मात्र मनसेच्या दुसऱ्या यादीमध्ये नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर अशा दोन महत्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला नाही. तसेच वरळी बाबतही अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजत आहे.