Schools To Reopen In Pune: पुणे जिल्ह्यामध्ये 1-4 चे वर्ग 6 डिसेंबर पासून ऑफलाईन भरणार
School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ओमिक्रॉन व्हेरिएंटचं (Omicron Variant) संकट घोंघावत असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा पुन्हा ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. पण आता काही भागांत शाळा सुरू झाल्या आहेत. पुणे ग्रामीण भागात देखील पहिली ते चौथीची शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. 6 डिसेंबर पासून या शाळा सुरू होणार आहेत. राज्यात 1 डिसेंबर पासून या शाळा सुरू होणार होत्या पण ओमिक्रॉनच्या संकटामुळे त्या 15 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण प्रमाणेच पुणे शहरातील देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेतल्या जाणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी काढलेल्या पत्रकातील माहितीनुसर, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा ऑफलाईन स्वरूपात सुरू करण्यासाठी 6 डिसेंबर ही तारीख ठरवण्यात आली आहे. पुण्यात आता सुमारे 2 वर्षांनंतर पुन्हा विद्यार्थ्यांना शाळेचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. आतापर्यंत सार्‍यांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होते.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये यापूर्वी पाचवी ते बारावीचे सुरू करण्यात आले आहेत. ते वर्ग सुरळीत सुरू असल्याने आता एकूण परिस्थिती पाहता पहिली ते चौथील्या शाळा सुरू करण्यात काय अडचण आहे? असा सवाल विचारल्यानंतर पहिली ते चौथीचे देखील वर्ग करण्यासाठी प्रशासन पुढे आले आहे. हे देखील वाचा: Maharashtra School Reopening: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेत Health Clinic उभारणार.

दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाने शहरात मात्र पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये अजूनही लहान मुलांना कोरोनाची लस देण्यात आलेली नाही. लवकरच लहान मुलांचे देखील लसीकरण सुरू करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. सध्या तज्ञांसोबत त्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. पण काही दिवसांपूर्वी राज्यासह देशातच कोरोना संकट नियंत्रणात आल्याचं चित्र असल्याने प्रशासन आणि सरकारने चाईल्ड टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार शाळा ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.