Schools Reopen in Maharashtra: राज्यात येत्या 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र मुंबई आणि ठाणे वगळता अन्य ठिकाणी शाळा सुरु केल्या जाणार आहेत. मात्र शाळा सुरु केल्यास त्यावेळी कोरोनाच्या संदर्भातील नियम आणि अटींचे पालन होईल का याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शाळेतील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता शाळा पुन्हा कशा सुरु करायच्या असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.(BMC Notice to Shopping Malls: अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 29 शॉपिंग मॉल्सला महापालिकेने धाडल्या नोटीसा)
मुंबई आणि ठाणे येथे येत्या 31 डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अन्य ठिकाणी येत्या 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरु केल्या जाणार आहे. मात्र शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी गेली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या चाचणीमध्ये काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, उस्मानाबाद येथे शिक्षकांची कोरोनाची चाचणी केली असता त्यामध्ये 28 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दुसऱ्या बाजूला नांदेड मधील 11 शिक्षक, औरंगाबाद मध्ये 15 आणि बीड मध्ये 25 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळे आता विद्यार्थ्यांसह पालकांना चिंता वाटू लागली आहे. (BMC School Closed Till December 31: मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद; आयुक्तांचे आदेश)
तसेच मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबद्दल स्थगिती द्यावी अशी मागणी केली जात आहे. कारण शाळा सुरु केल्यास कोरोनाची लागण होऊ शकते असा सुद्धा सवाल उपस्थितीत केला जात असल्याने या निर्णयावर विचार करावा असे ही म्हटले जात आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातूनच अभ्यास आणि शाळा सुरु ठेवण्यात याव्यात असे ही म्हटले जात आहे.