Thane ग्रामीण भागात 15 मार्चपासून ऑफलाईन शाळा बंद; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रामध्ये वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता आता ठाणे शहरातील ग्रामीण भागातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार आता जिल्हा प्रशासनाने शाळा व्यवस्थापनांना पुढील आदेश मिळेपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद ठेवून केवळ ऑनलाईन माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा ठाणे ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयं म्हणजे इयत्ता 5 वी ते 12वीचे वर्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवल्या जाणार आहेत.

27 जानेवारी 2021 पासून ठाणे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढलेला प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणामध्ये आल्याचं चित्र होतं. त्यामुळे 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले होते. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहापूर आणि मुरबाड नगरपंचायत क्षेत्रामध्ये 5 वी ते 12 वी च्या शाळा, कॉलेज आणि वसतीगृहातील शिक्षण सुरू झाले होते. मात्र आता पुन्हा त्यांना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने 16 हॉट्सस्पॉट्स जाहीर करत तेथे लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत लागू असणार आहे त्याबाबतचेही प्रसिद्धपत्र जाहीर करण्यात आले आहे.