मुंबई: नको त्या ठिकाणी बांबू लावल्याने स्कूलबसला अपघात; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
School Bus accident | (Photo credit: archived, edited, representative image)

पालकांनो घर ते शाळा या प्रवासासाठी तुम्ही मुलांना जर स्कूल बस (School Bus) सेवा वापरत असाल तर सावधान! तुमची मुलं सुरक्षितच आहेत या समजात राहू नका. स्कूलबसमधून प्रवास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे मुंबईतील (Mumbai) एका घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. सांताक्रूझ (Santacruz) येथील पोदार इंग्लिश स्कूल (Podar English School santacruz) या नामांकित शाळेच्या स्कूल बसला अपघात (School Bus Accident) झाला. या अपघातात एक धक्कादायक वास्तव समोर आले. या बसला अपघात झाला नसता तर, कदाचित हे वास्तव पुढे आलेच नसते. ही घटना मंगळारी (5 फेब्रुवारी) घडली.

एका कारला धड दिल्याने पोदार इंग्लिश स्कूलच्या स्कूल बसचा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता पोलिसही अवाक झाले. या बस चालकाने बसला असलेल्या इंजिनला गिअरऐवजी चक्क बांबू लावला होता. गिअरला बांबू लाऊन हा चालक गाडी कसा चालवत असेल याचा पोलिसांना चांगलाच अंदाज आला. गिअरऐवजी बांबू वापरून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल. तसेच, अपघात घडलेबद्दल खाररोड पोलिसानी चालकाला अटक केली. राज कुमार (वय 21 वर्षे ) असे चालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, खार येथील एका व्यवसायिकाच्या बीएमडब्लू कारला स्कूलबसने धडक दिली. ही घटना मथू पार्क येथे घडली. या धडकेनंतर बस चालकाने गाडी न थांबवता गाडी पुढे नेली. त्यामुळे या या व्यवसायिकाने स्कूलबसचा पाटलाग करुन बस थांबवली व पोलिसांशी संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने आले. त्यांनी चालकाला अटक केली. मात्र, काही वेळातच त्याची जामीनावर सूटकाही केली. (हेही वाचा, Himachal Pradesh : शाळेच्या बसला अपघात, 35 विद्यार्थ्यांना दुखापत)

दरम्यान, गिअरच्या लवरमध्ये बिघाड झाला होता आणि तो दुरुस्थीसाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे गेले तिन दिवस आपण गिअरऐवजी बांबू वापरुनच आपण बस चालवत असल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या प्रकाराची माहिती शाळा व्यवस्थापनाला दिली असून, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर आवश्यक ती इतर सर्व पावले उचलण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती खार पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. पोलिसांनी हे प्रकरण आता वाहतूक पोलिसांकडे सोपवले आहे.