उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Jyakwadi Dam

मराठवाडा पाणीप्रश्नी (Marathwada Water Issue) आज सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court of India)  महत्त्वाचा निर्णय आला आहे. सुप्रिम कोर्टाने उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून (North Maharashtra Dams) जायकवाडी मध्ये पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडूनही आता कायम ठेवला गेला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणामध्ये (Marathwada Jayakwadi Dam)  8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. याप्रकरणी अहमदनगरच्या प्रवरा, संजीवनी, शंकरराव काळे कारखानामधून याचिका दाखल करण्यात आली होती. या तिन्ही कारखान्यांचा जायकवाडीला पाणी देण्याला विरोध होता.

नगर जिल्ह्यातील कारखानदारांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध होता.त्यावर झालेल्या आजच्या सुनावणीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. राज्य सरकार कडून पाणी सोडण्यास कोर्टाने अनुमती दिली आहे. Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्यात पाणीसंकट, जायकवाडी धरणात यंदा फक्त 33 टक्केच पाणीसाठा .

2005 च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाचा विचार करता नाशिमधील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत करण्यात आला होता. मात्र आता या कायद्याला विरोध होत असून कायद्याचा फेरविचार व्हावा म्हणून अहमदनगर आणि नाशिक मधून मागणी होत आहे.

दमणगंगा, नारपार नद्यांच्या खोऱ्यांमधून गुजरातला पाणी घेऊन जाण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. या नारपार योजनेला देखील नाशिकच्या स्थानिकांचा विरोध आहे. यंदा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होऊ शकतो, भविष्यात शेतीवरही परिणाम होऊ शकतो अशी स्थानिकांच्या मनात धाकधूक आहे.