राज्यात यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली होती. सामान्यत: जूनमध्ये सुरु होणाऱ्या पावासाने जुलैमध्ये आपली हजेरी लावली होती. यानंतर जुलै महिन्यात पावसाच्या हजेरीने सुखावलेल्या बळीराजाचा हा आनंद दिर्घकाळ टिकू शकला नाही. कारण ऑगस्ट हा संपुर्ण महिनाच कोरडा गेल्याने शेतकरी संकटात सापडला होता. संप्टेंबर महिन्यात देखील अद्यापही पाऊस हा हुलकावणी देत आहे. यामुळे राज्या पाणी प्रश्न आता बिकट बनत चालला आहे. पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात (Marathwada) परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Update: पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा)
मराठवाड्याची तहान भागवणारे धरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा देखील कमी होत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी 96.87 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात यंदा फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता सर्वच जण जोरदार पाऊस होण्याची प्रार्थना ही करत आहे.
नाशिक भागातील धरणे भरल्यावर खाली गोदावरीच्या माध्यमातून पाणी जायकवाडी धरणात सोडले जाते. मात्र, यंदा नाशिक भागात जोरदार असा पाऊस झालाच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणात पाणी आलेच नाही. अशा परिस्थितीत धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. यामुळे जायकवाडी धरणात फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.