मुंबई, पुण्यासह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी अलर्ट हा देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहगे. याशिवाय धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
Rain/thundershowers expected over parts of interior Maharashtra during next 2-3 days. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट द्यI pic.twitter.com/zDqKx6o2sd
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)