Representational Image (Photo Credits: File Image)

पुण्यामध्ये आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh) यांचा खून झाला आहे. अपहरणानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने सध्या खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांच्या युनिट 5 कडून एकाला अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणामध्ये 5 आरोपी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी पहिली अटक वाघोली (Wagholi) मधून झाली आहे.

योगेश टिळेकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचे मामा मांजरी मध्ये राहत होते. मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचं हॉटेल ब्ल्यू बेरी समोर अपहरण झाले. त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.

सतीश वाघ हे शेवाळवाडी भागातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते आमदार टिळेकरांचे मामा असले तरीही राजकारणाशी त्यांचा संबंध नव्हता. त्यामुळे त्यांचे अपहरण का झाले? कुणी केले? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. सध्या 16 पोलिस पथकं सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींचा शोध घेत आहेत. अपहरणानंतर वाघ यांचा खून तीक्ष्ण हत्यारांनी झाला आहे.