Crime | (Photo Credits: PixaBay)

सातारा (Satara) येथे अंडी उधार न दिल्याने दुकानदाराची हत्या करण्यात आली आहे. सातारा येथील बोगदा परिसरात दगड आणि धारधार शस्त्रानं वार करुन दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये (Shahupuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. शुभम कदम (Shubham Kadam), सचिन माळवे (Sachin Malve) अशी या आरोपींनची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सातारा मधील यवतेश्वर पॉवर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले यांचं दुकान आहे. शुक्रवारी रात्री उशिरा शुभम कदम, सचिन माळवे हे त्यांच्या दुकानात गेले होते. त्यांनी बबन यांच्याकडे अंडी उधार मागितली. मात्र बबन यांनी अंडी उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे संतापलेल्या शुभम आणि सचिन यांनी बबन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दगड आणि धारदार शस्त्रानं वार केले. यात बबन यांचा जागीच मृत्यू झाला. (Nagpur Crime: प्रेमसंबंधांना विरोध केला म्हणून तरूणाने प्रेयसीच्या आजी व लहान भावाची केली हत्या; त्यानंतर स्वत:चेही जीवन संपवले)

दरम्यान, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून हत्या करण्यामागं अंडी उधार न देणं या व्यतिरिक्त दुसरं काही कारण आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत. (Uttar Pradesh: दलित व्यक्तीशी लग्न केल्याच्या रागातून भावांनी गोळी झाडून केली बहिणीची हत्या; शेतात गाढला मृतदेह)

सातारा येथून अजून एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. फुड पॉयजनिंगमुळे 3 चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. कराड मधील सैदापूर येथील सासवे कुटुंबात ही घटना घडली. मात्र मुलींचा मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, यापूर्वी ही शुल्लक कारणावरुन हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.