Udayanraje Bhosale | (Photo credit : Facebook)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसोबतच सातारा मध्ये लोकसभा पोट निवडणूकदेखील पार पडली. त्याचा निकाल देखील विधानसभेसोबतच लागला. राष्ट्रवादी पक्षातून भाजपामध्ये उदयनराजे भोसले यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये उदयनराजे भोसले यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला आहे. आज उदयनराजे भोसले यांनी त्याबाबतचे ट्वीट करताना हरलो आहे थांबलो नाही असं म्हटलं आहे. उदयनराजे भोसले यांची 'मिशी'ची भीती खरी ठरली, विजयानंतर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया

उदयन राजे यांचा श्रीनिवास पाटील यांनी लाखभराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे जवळचे मित्र, सनदी अधिकारी होते. क्रांतिसिंग नाना पाटील यांचादेखील श्रीनिवास यांना जवळचा सहवास लाभला आहे. उदयनराजे भोसले यांना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांचा राजकीय प्रवास घ्या जाणून; सनदी अधिकारी ते राज्यपाल मार्गे पुन्हा खासदार

उदयनराजे भोसले ट्वीट

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावरून निवडून आले होते. मात्र त्यानंतर तीन महिन्यांतच त्यांनी पक्षांतर केले. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांचा भाजपामध्ये पक्षाप्रवेश झाला होता. त्यावेळेस शिव छत्रपती यांचा वारसा चालवणार्‍या उदयन राजे यांनी मोदी सरकार सोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सांगत भाजपामध्ये प्रवेश केला होता.