Satara District Bank Election | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल (Satara District Bank Election Result) जाहीर झाला आहे. काही ठिकाणी अपेक्षीत तर काही ठिकाणी अनपेक्षीत निकाल पाहायला मिळत आहे. सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे, जावळी आणि पाटण येथून. या ठिकाणी जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा तर पाटण विकास सेवा सोसायटी गटातून शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी मात्र विजयी बाजी मारली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी लढत झाली. दरम्यान, 21 पैकी 11 जागा आगोदरच बिनविरोध झाल्या. त्यामुळे उर्वरीत 10 जागांसाठी मतदान झाले. यात आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणी निकालानुसार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. तर शंभूराज देसाई यांना पारंपरीक प्रतिस्पर्धी सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.  विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा कराड सोसायटी गटातून पराभव झाला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी हे या ठिकाणी विजयी झाले. त्यांनी उंडाळकरांचा पराभव केला.

जाणून घ्या निकाल, उमेदवारांना मिळालेली एकूण मते

जावली सोसायटी गट-

एकूण मते- 49

ज्ञानदेव रांजणे – 25 (विजयी)

शशिकांत शिंदे – 24 (पराभूत)

पाटण विकास सेवा सोसायटी गट-

सत्यजित पाटणकर – 58 (विजयी)

शंभूराजे देसाई – 44 (पराभूत)

कराड सोसायटी गट –

बाळासाहेब पाटील – 74 (विजयी)

उदयसिंह उंडाळकर पाटील – 66 (पराभूत)

कोरेगाव-

शिवाजीराव महाडीक-45 (समान मते)

सुनील खत्री-45 (समान मते)

खाटाव-

प्रभाकर घार्गे-56 (विजयी)

नंदकुमार मोरे-46 (पराभूत)

माण-

शेखर गोरे-36 (समान मते)

मनोजकुमार पोळ-36 (समान मते)

नागरी बँक/नागरी सहकारी बँक

रामराव लेंभे-307 (विजयी)

सुनील जाधव-47 (पराभूत)

इतर मागासवर्गीय सदस्य

शेखर गोरे-379 (पराभूत)

प्रदीप विधाते-1459 (विजयी)

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक म्हणजे प्रत्येकाच्या उत्सुकतेचा विषय. ग्रामीण आणि शेतकरी वर्गाशी थेट नाळ जोडल्याने तळागाळात या बँकांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असते. सहाजिकच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीकडेही हे लक्ष होते. आज सकाळी आठ वाजलेपासूनच मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली. मतमोजणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होती. पोलीस बंदोबस्तही चौख तैनात होता.