हिवाळी अधिवेशनाच्या (Sarpanch Parishad) पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा इशारा सरपंच परिषदेनं (Sarpanch Parishad) राज्य सरकारला (Mahavikas Aghadi Government) दिला आहे. वित्त आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेत कपात करण्यात येऊन नये या प्रमुख मागणीसह इतरही अनेक मागण्यांसाठी सरपंच परिषद आक्रमक आहे. राज्य सरकारकडे अनेकदा निवेदन देऊन आणि मागणी करुनही प्रश्न सुटला नाही असे सांगत सरपंच परिषदेने हा इशारा दिला आहे. सरपंच परिषदेचे मुंबई अध्यक्ष दत्ता काकडे यांनी महाविकासआघाडी सरकारला हा इशारा दिला आहे.
सरपंच परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी एक सरपंच मेळावा घेतला. या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे उपस्थित होते. या वेळी बोलताना काकडे यांनी राज्यातील मंत्री गुलाबराव पाटील आणि राज्य सरकारचे लक्ष वेदण्याचा प्रयत्न केला. काकडे यांनी म्हटले की, वित्त आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेत राज्य सरकारकडून कपात करण्यात येत आहे. या रकमेत कपात करण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, या मागणीसह आमच्या इतरही 10 ते 12 मागण्या आहेत. या मागण्या राज्य सरकारकडून मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्याती सर्व ग्रामपंचायती एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, असे काकडे म्हणाले. (हेही वाचा, पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी 861 कोटी रूपयांचा निधी प्राप्त)
दरम्यान, सूत्रसंचालक समन्वयकांनी मेळाव्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतले. यावरुन काही काळ वाद निर्माण झाला. एका सरपंचाने या नावाला आक्षेप घेतला. त्यावर आणखी एक सरपंच बोलला. यावरुन वाद झाला. मात्र, आयोजकांनी माफी मागत वादावर पडदा टाकला आणि हा वाद थांबला असे उपस्थितांपैकी काही सरपंचांनी सांगितले.