Sarkari Naukri  कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, हॉस्पीटल मॅनेजर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट यांसह विविध पदांसाठी नोकर भरती; थेट मुलाखत, जाणून घ्या वेळ, ठिकाण आणि पदसंख्या
Coronavirus KDMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) कोविड 19 (Covid 19) प्रतिबंध अंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी भरती करत आहे. ही भरती वैद्यकीय अधिकारी, हॉस्पीटल मॅनेजर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट यांसह विविध पदांसाठी आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. ही भरती निव्वळ तात्पुरत्या/अस्थायी स्वरुपात कंत्राटी पद्धतीने होणार आहे. गुणवत्ता असलेले पात्र उमेदवार या भरतीसाठी थेट मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. त्यासाठी पद, पदसंख्या, शैक्षणिक आर्हता व अनुभव मानधन आणि मुलाखतीची वेळ व ठिकाण खालीलप्रमाणे.

अ.    क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक आर्हता व अनुभव दरमहा एकत्रित मानधन
1 वैद्यकीय अधिकारी 30 एमडी/डीएनबी मेडीसीन/अनेस्थेशिया एमडी प्लुमोनरी मेडीसीन/क्रिटीकल केअर/आयडीसीसीएम/एमबीबीएस.डीए/एमबीबीएस,आयडीसीसीएमसहडीटीसीडी दोन वर्षांचा अनुभव 25,0000/-
2 हॉस्पीटल मॅनेजर 8 कोणत्याही शाखेचा वैद्यकीय पदवीधर, रुग्णालय व्यवस्थापनाचा एक वर्षाचा अनुभव 35,000/-
3 वैद्यकीय अधिकारी 120 एमबीबीएस 75000/-
4

 

 

 

 

 

5

आयुष वैद्यकीय अधिकारी 120 बीएएमएस/ बीएचएमएस/ बीयूएमएस 50000/-/-
स्टाफ नर्स

 

सहा.परिचारीका प्रसविका (एएनएम)

 

नरसिंग असिस्टंट

588 जीएनएम/ बीएससी नर्सिंग

 

(स्टाफ नर्सच्या एकूण जागांपैकी आवश्यक त्या संख्येइतके जीएनएम/बीएससी नर्सिंग पात्ता धारक उमेदवार न मिळाल्यास एएनएम/नर्सिंग असिस्टंट पात्रता धारक उमेदवारांकडून नियुक्ती केली जाईल

स्टाफ नर्स-30000/-
एनएनएम- 25000/-
नर्सिंग असिस्टंट- 20000/-
6 एक्स-रे टेक्निशियन 14 डिप्लोमा इन एक-रे टेक्निशियन 22500/-
7 फार्मासिस्ट 15 बी फार्म/डी फार्म 22500/-
9 ईसीजी, टेक्निशियन 9 डीप्लोमा इन इसीजी, टेक्निकल अँड एक्सपिरियन्स ऑफ इसीजी टेक्निकल किमान एक वर्षांचा अनुभव 22500/-
9 लॅब टेक्निशियन 9 बीएससी, डीएमएलटी 22500/-
10 वॉर्डबॉय 80 10* पास 18000/-

(हेही वाचा, Sarkari Naukri: Lok Sabha Secretariat कडून 47 जागांवर भाषांतरकार पदासाठी नोकरभरती जाहीर; असा करा ऑनलाईन अर्ज)

मुलाखतीचे ठिकाण- आयुक्त कार्यालय, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प).

थेट मुलाखत दिनांक- 30/6/2020 (मंगळवार)- अ.क्र. 9 मधील पदे, दि.1/7/2020 (बुधवार)अ. क्र. 10 मधील पद (वॉर्डबॉय)

उमेदवारांची नोंदणी आणि मूळ कागदपत्रे छाननी व तपासणी- सकाळी 11 ते दुपारी 1.30 पर्यंत.

थेट मुलाखतीची वेळ- दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिलेल्या जाहीरातीमध्ये रिक्त पदसंख्येपेक्षा कमी पात्र उमेदवार उपलब्ध झाल्यास मुलाखती न घेता नियुक्ती देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही म्हटले आहे.