Sardar Tara Singh Death Rumor: सरदार तारा सिंह यांच्या मृत्यूच्या बातम्या अफवा; अत्यावस्थ अवस्थेमधून लवकर बाहेर पडावेत यासाठी प्रार्थना करा: भाजपा नेते विनोद तावडे
File Photo Of विनोद तावडे (Photo Credits: ANI)

भाजपा नेते आणि मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सरदार तारा सिंह (Sardar Tara Singh) यांच्या मृत्यूच्या अनेक बातम्या आज सकाळपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. दरम्यान आता काही वेळापूर्वीच भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सरदार तारा सिंह यांच्या मृत्यूच्या बातम्या अफवा असल्याचं स्पष्ट केले आहे. सरदार तारा सिंह अत्यावस्थ अवस्थेमध्ये मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) उपचार घेत आहेत. काही वेळापूर्वीच विनोद तावडे यांनी लीलावती रूग्णामध्ये जाऊन त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची भेट घेतली आहे.

दरम्यान विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा सिंह अत्यावस्थ आहेत. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकांनी तारा सिंह आजारपाणातून लवकर बाहेर व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. तसेच तारा सिंह यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना असं म्हटले आहे. Sardar Tara Singh Death Rumours: मुंबई भाजपा नेत्यांनी सरदार तारा सिंह यांच्या निधनाचा शोक संदेश शेअर केल्यानंतर ट्वीटस केले डिलिट

भाजपा नेत्यांनीच सरदार तारा सिंह यांच्या मृत्यूच्या बातम्या देत ट्वीटर वर श्रद्धांजली दिली होती. मात्र नंतर काही वेळातच ट्वीट डिलिट देखील केले. दरम्यान किरीट सोमय्यांनी तासाभरापूर्वी तारा सिंह यांच्या प्रकृतीची माहिती देत ते अत्यावस्थ असले तरीही स्थिर असल्याचं सांगत सोशल मीडीयात उलट सुलट सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला होता.