Chief Minister Ajit Pawar (PC - Twitter)

मराठा समाजाशी (Maratha)  संबंंधित महत्वाची अशी सारथी संस्था व अन्यही योजनांंचे कामकाज यापुढे उपमुख्यमंंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar)  सांंभाळणार असल्याचे समजतेय. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) परिपत्रक जाहीर करुन घोषणा केली आहे. यापुढे राज्य सरकारच्या मराठा समाजासाठीच्या योजनांंची अमंंलबजावणी करण्याचे काम अजित पवार यांंच्या अख्तियारीत असणार्‍या नियोजन विभागाकडे असणार आहे. यापुर्वी हे काम विजय वडेट्टीवार (Vijay Waddetiwar) पाहत होते मात्र वडेट्टीवर हे स्वतः ओबीसी समाजातील असल्याने मराठा समाजासाठीच्या योजनांंच्या बाबत दुर्लक्ष होत आहे असे आरोप सातत्याने करण्यात येत होते अखेरीस स्वतः वडेट्टीवार यांंनी अजित पवारांंना हे काम आपल्या विभागात घेण्याची विनंंती केली होती ज्यानुसार आज हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

यापुर्वी जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत सारथी संस्थेला राज्यसरकार द्वारे आठ कोटी रुपयांंचा निधी देण्याबाबत अजित पवार यांंनी घोषणा केली होती. या बैठकीत संभाजीराजे भोसले, विजय वडेट्टीवार, अल्पसंख्याक नवाब मलिक, शिवसंग्राम संघटनेचे विनय मेटे उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संकटकाळात आर्थिक अडचणीत असल्याने सरकार सारथी संस्था बंंद करणार अशाही अफवा मध्यंंतरी पसरल्या होत्या, यावर मागेच अजित पवार यांंनी उत्तर देत, कोणत्याही परिस्थितीत सारथी संस्था बंद केली जाणार नाही असे सांंगितले होते. सारथी संस्था ही मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय यांंना सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक,शेती विषयी विकास करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम करते