बीड (Beed) मध्ये केज तालुक्यार च्या सरपंचाचे अपहरण करून खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत सरपंचाचे नाव संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आहे. या घटनेला 24 तास उलटून गेले तरीही आरोपी मोकाट असल्याने आता स्थानिकांना राग अनावर झाला आहे. मृत सरपंचाचे नातेवाईक संतप्त झाल्याने आता अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान संतोष देशमुख आणि त्यांचा चालक मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ काही अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली. त्यांनी सरपंच संतोष देशमुखांना गाडीतून बाहेर काढत त्यांना मारहाण सुरू केली. नंतर त्यांना जबरदस्ती दुसर्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. या प्रकरणी केज पोलिस स्टेशन मध्ये अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिस तपास करत असताना त्यांना काही तासातच बोरगाव दहिटना रोड वर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळला.
संतोष यांनी गावात अनेक चांगली कामं केली होती. त्यांच्या निधनाची अशी बातमी समजताच गावकर्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश येत नसल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको पुकारला आहे. नक्की वाचा: Pune Shocker: पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या, शहरात खळबळ.
केज प्रमाणेच पुण्यातही विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा देखील अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांचे अपहरण झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसले नंतर त्यांचा मृतदेह आढळला.