Christmas 2018: गणपतीला सांताक्लॉजचे कपडे घातल्यने तणाव
गणपतीला सांताक्लॉजचा ड्रेस घातल्याने तणाव | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Christmas 2018: अपवाद वगळता देशभरात ख्रिसमस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मियांचा हा सण असला तरी, इतर धर्मातील लोकही हा सण मोठ्या आवडीने साजरा करतात. दरम्यान, हा सण साजरा करताना थेट गणपतीलाच (Ganpati) सांताक्लॉजचे कपडे (Santa Claus Dress) घातल्याने तणाव निर्माण झाला आहे. अकोला (Akola) येथील गायगाव (Gaigaon) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात हा प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार, अकोल्यापासून अवघे 15 किलोमीटर असलेल्या गायगाव येथील हे गणपती मंदिर राजू अग्रवाल यांच्या शेतात आहे. हे शेत अग्रवाल यांच्या खासगी मालकीचे आहे. नाताळचा सण साजरा करताना त्यांनी गणपतीला सांताक्लॉजचा पोशाख चढवला होता. मात्र, गणपती ही हिंदूंची देवता आहे. त्यामुळे त्याला सांताचा पोषाक चढवल्याने हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे भरत मिश्रा यांनी केला आहे. या प्रकाराची माहिती समजताच मिश्रा यांनी कार्यकर्त्यांसह गायगवाला जात या प्रकाराच निषेध नोंदविला. (हेही वाचा, 25 डिसेंबर-ख्रिसमस इतिहास; पहिला ख्रिसमस कधी साजरा झाला?)

दरम्यान, गायगाव येथील गणेश मंदिर हे आपल्या खासगी मालकीचे आहे. ख्रिसमसचा सण साजरा करण्याच्या उद्देशाने आपण गणपतीला हा पोषाख केला होता. मात्र, त्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला होतू नसल्याचे अग्रवाल यांचे म्हणने आहे