संत गजानन महाराज (Sant Gajanan Maharaj) यांचा आज (13 फेब्रुवारी) 45 वा प्रकट दिन साजरा केला जात आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने बुलढाण्यातील शेगाव मध्ये लाखो भक्त दाखल झाले आहेत.दरवर्षी माघ कृष्ण सप्तमी चा दिवस संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन म्हणून साजरा करण्याची रीत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रसोबतच गुजरात आणि शेगाव मधून अनेक दिंड्या शेगाव मध्ये दाखल होतात.
भाविकांच्या धारणेनुसार, गजानन महाराजांचा प्रकट दिन हा शुभ दिवसांपैकी एक आहे. त्यामुळे बुलढाण्यातील शेगाव मध्ये अनेक भाविक दाखल होतात. प्रकटदिनी गजानन महाराजांच्या मंदिरा मधून पालखी काढली जाते. त्यांच्या पादूकांचेही पूजन केले जाते. यंदा कोविड 19 संकटानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे भाविकांच्या गर्दीमध्ये हा प्रकटदिन सोहळा पार पडत आहे. त्यासाठी मंदिरालाही आकर्षक रोषणाई केली आहे.नक्की वाचा: Gajanan Maharaj Prakatdin 2023 Wishes: 'गण गण गणात बोते' म्हणत गजानन महाराज प्रकट दिन निमित्त भक्तांसाठी Wallpapers, Greeting सह शुभेच्छा संदेश.
पहा आजच्या दिवशी केलेली खास रोषणाई
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावात आज गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/bzc658XjcW
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 13, 2023
महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा आहे त्यापैकी एक संत गजानन महाराज. शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे जगाच्या कानाकोपर्यात पोहचलं. गजानन महाराज भाविकांच्या धारणेनुसार, 23 फेब्रुवारी 1878 साली शेगाव मध्ये वद्य सप्तमीला गजानन महाराजांचे पहिले दर्शन झाले. त्यानुसार हा दिवस गजानन महाराजांचा प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.