महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाची (ED) कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांसमोर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असतानाही केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणली जात आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे. एवढेच नव्हेतर, गुन्ह्यांचे स्वरुप पाहता राज्यातील तपास यंत्रणा समर्थ आहेत. पण, केंद्रीय पथक कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करतात हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील काही लोकांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर जे आरोप लावले जात आहेत, त्यांचा तपास करण्यासाठी राज्यातील तपास यंत्रणा सक्षम आहेत. मात्र, तरीही केंद्रीय पथके कारवाई करत आहेत. तसेच ही पथके कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत आहेत. हे भारतीय संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून कोणती प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. हे देखील वाचा- 'लवकरच बातमी कळेल' Pratap Sarnaik यांनी लिहिलेल्या पत्राविषयी Sanjay Raut यांचे महत्वाचे वक्तव्य
दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रातील लसीकरण मोहीमे संदर्भातही भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. नरेंद्र मोदींनी ही मोहीम वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचे स्वागत करतो, असे राऊत यांनी म्हटले आहे.