Anil Bonde (Photo Credit - Twitter)

राज्यातील राज्यसभेच्या निकालानंतर (Rajya Sabha Election Result 2022) भाजप (BJP) नेते शिवसेनेवर तटून पडले आहे. त्याच्यावर टीका करण्याची ते एकही संधी ते सोडत नाही आहे. यावर आता भाजपचे राज्यसभेचे निवडून आलेले खासदार डाॅ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यवर निशाना साधला आहे. अनिल बोंडे म्हणाले आहे की संजय राऊत यांनी आपल बोलण थांबवाव, नाहीतर शिवसेना (Shivsena) लंबी होवून जाईल. संजय राऊत हे दरोरज सकाळी पत्रकारांशी बोलतात. काहीही बोलतात आणि दिवसभर तेच वक्तव्य टीव्हीवर सुरु असल्याने शिवसैनिकही वैतागले आहे. त्यामुळे शिवसैनिक म्हणायला लागले की, संजय राऊत यांनी बोलन थांबवाव, अन्यथा शिवसेना लंबी होईल. अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

अपक्षांना केल बदनाम

अनिल बोंडे हे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले आहे की संजय राऊत यांनी अपक्षांना बदनाम केले आहे. अपक्ष आमदार हे घोडेबाजारात खपले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अश्या प्रकारचा गाडवपणा कोणा करणार नाही. तीन लाख लोकांनी निवडून दिलेला आमदार हा पैशानी खपतो. अस वारंवार संजय राऊत सांगतात. जो पर्यत आरोप सिध्द होत नाही तोपर्यत असा आरोप करु नये. मात्र, अपमान करण्याचा गाढवपणा संजय राऊत यांनी केला आहे. (हे देखील वाचा: Rajya Sabha Election Result 2022: सुजय विखे पाटलांचा खळबळजनक दावा, 'राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार')

पंकजा मुंडे आजही मोठ्या नेत्या

भारतीय जनता पक्षात सर्वांना न्याय दिला जातो. संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलू नये, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने मावळ्याला पराभूत करून सामान्य माणसाचा अपमान केला आहे. भाजप मध्ये सर्वांना योग्य सन्मान मिळते. पंकजा मुंडे आजही मोठ्या असून पुढे आणखी मोठ्या होतील. त्यामुळे त्यांची काळजी संजय राऊत यांना करायची गरज नाही.