महाराष्ट्राच्या पाठोपाठ आता गोवा (Goa) राज्य देखील राजकीय भूकंप अनुभवणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नव्या ट्विटर मधून दिले आहेत. आता गोवा सुद्धा भाजप मुक्त (BJP Free Goa) कारण्याचे प्रयत्न शिवसेना (Shivsena) करत आहे आणि यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (Maharashtravadi Gomantak Party) नेत्याचा पाठींबा आपल्यासोबत आहे असेही राऊत यांनी म्हंटले आहे. राऊत यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा होत असल्या तरीही आपण गोव्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील नसल्याचे काँग्रेस (Congress) ने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. (Maharashtra Government Formation: उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती 22 डिसेंबरला होणार; प्रफुल्ल पटेल यांची माहिती)
संजय राऊत यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. “गोव्यात भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक असल्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे (एमजीपी) नेते सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.”असे राऊत यांचे ट्विट आहे.
संजय राऊत ट्विट
Maharashtrawadi Gomantak Party
(MGP) leader Sudin Dhavalikar says he is
positive about proposal mooted by Shiv Sena to form anti-BJP front in Goa.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2019
याबाबत आधी सुद्धा राऊत यांनी माध्यमांसमोर वाच्यता केली होती. महाराष्ट्र पाठोपाठच गोव्यात (Goa Government) सुद्धा भाजपचे सरकार पाडून हळूहळू संपूर्ण देश भाजपमुक्त (Non-BJP) करू असाही इशारा राऊत यांनी दिला. गोव्याच्या सद्य स्थितीतील सरकारचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या सोबत मिळून आता गोव्याच्या राजकारणाला नवीन वळण देण्याचे आम्ही योजत आहोत. लवकरच आपल्याला एक राजकीय चमत्कार पाहायला मिळणार आहे असे राऊत यांनी सांगितले होते.
दरम्यान, राऊत यांच्या वक्तव्यानंतर 24 तासांच्या आतच गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं होतं. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली होती. गोव्यात 40 पैकी 30 आमदार हे भाजपाच्या बाजूनं आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासने आधी तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा, असा टोला भाजपा नेते विनय तेंडुलकर यांनी राऊत यांना लगावला होता.