Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

महारष्ट्रात (Maharashtra ) शिवसेना (Shiv Sena) आणि मराठी माणूस आहे म्हणून मंबई (Mumbai) महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची शक्ती यशस्वी होत नाहीत. शिवसेना आणि मराठी माणूस यांच्या एकोप्यामुळेच महाराष्ट्र आणि मुंबई विरोधी ताकद यशस्वी होत नाही, असे रोखठोक विधान शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. दाऊद इब्राहीम याच्याबाबत आम्हाला सांगू नये. शिवसेनेने दाऊदसोबतचा लढा दिला आहे. आपण म्हणता तसे मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत. प्रामुख्याने ती झोपडपट्टी, चाळ अथवा गरीब, मध्यमवर्गीय लोकांची आहेत. पण हे लोक मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणत नाहीत. महाराष्ट्रावर टीका करत नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. त्यासोबतच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणारी ताकद कार्यरत आहे. हे सर्वांना माहिती आहे. किमान मराठी प्रसारमाध्यमांनी तरी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करु नये, असेही राऊत म्हणाले.

ज्यांचा मुंबई, महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. देणंघेणं नाही. असे लोक महाराष्ट्र आणि मुंबई विषयी बोलत आहेत. हे मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस कसे सहन करेन? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. कंगना राऊत किंवा इतर विषय हे अगदी छोटे आहेत. त्याला फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. हा विषय शिवसेनेसाठी संपला आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Shiv Sena Criticism on BJP: देशात सुरु असलेल्या खुळचट,बुळचट प्रकारावरुन ऑलिम्पिकमध्ये 'पोरखेळ' प्रकारात सूवर्णपदक हमखास मिळेल, शिवसेनेचा टाला)

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कोरोना व्हायरस हे संकट राज्यासमोर गंभीर आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्ष, जात, धर्म बाजूला सारुन येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे. मराठा समाजात हा देखील बहुजन आहे. या समाजाला न्याया मिळावा अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. मी राज्य सरकारचा भाग नाही किंवा आरक्षणाबाबतच्या समितीचा घटकही नाही. त्यामुळे राज्य सरकार अथवा ही समिती त्याबाबत अधिक स्पष्टपणाने बोलू शकेन असेही राऊत म्हणाले.