शिवसेना पक्षाने भाजपसोबतच्या युतीमधून बाहेर जायचा निर्णय घेतला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक बैठक होऊन सुद्धा अजूनही सरकार स्थापनेच्या दिशेने कोणतीही अधिकृत हालचाल या दोन्ही पक्षांकडून दिसून आलेली नाही. त्याचसोबत काळ शरद पवार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट म्हंटलं की सत्ता स्थापनेचं काय होणार ते शिवसेनेला विचार, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
त्यामुळेच आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट (Sanjay raut meet Sharad Pawar) घेतली आहे.
विशेष म्हणजे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या भेटीदरम्यान संजय राऊत आणि पवार यांच्यामध्ये 10 मिनिटे चर्चा झाली.
पवारांच्या भेटीनंतर, “राज्यात राष्ट्रपती राजवट लवकर दूर व्हावी यावर आमच्या तिन्ही पक्षांचे एकमत आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होईल याबाबत मी खात्रीने बोलू शकतो.” असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
तसेच आज दुपारी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.
त्यांच्या ये भेटीनंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या प्रश्न खरंच सुटणार का की राष्ट्रवादी एक वेगळीच खेळी खेळून जाणार हे लवकरच कळेल.