हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करुन देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचे प्रतिउत्तर
Sanjay Raut | Photo Credits: Twitter

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज 7 वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा बाळासाहेबांना पुण्यतिथी निमित्त आदरलांजली देत ट्वीट केले होते. त्यामध्ये फडणवीस यांनी हिंदुत्व आणि स्वाभिमान असे शब्द वापरल्याने आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी असे म्हटले आहे की, शिवसेनेला कुणीही शहाणपण शिकवू नये. तर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले असता त्यांनी हे विधान केले आहे.

तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 7व्या स्मृतिदिनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खास व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. या व्हिडिओ मध्ये फडणवीस यांनी "बाळासाहेब हे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असे व्यक्तिमत्व होते, महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वैभव म्ह्णून त्यांच्याकडे पाहता येईल. ऊर्जेचा एक स्रोत म्ह्णून ओळखले जाणारे बाळासाहेब आपल्या एका वाक्याने छोट्यातील छोट्या व्यक्तीला सुद्धा प्रेरणा देऊन जायचे, असे म्हणत बाळासाहेबांच्या प्रतीची भावना व्यक्त केली तर, बाळासाहेबांनी आपणा सर्वांना स्वाभिमानाचा मूलमंत्र दिला आणि तो आपण जपलाच पाहिजे असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे. शिवसेना आणि भाजपा युतीला तडा गेल्यावरही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये असणारी समानता फडणवीस यांनी या व्हिडिओच्या रूपात शेअर केली आहे.(Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी देवेंद्र फडणवीस यांनी खास व्हिडीओ च्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली Watch Video)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेना पक्षात वाद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री असणार असल्याची बोलले जात आहे. या दरम्यान शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा दिसून आले. तर आज दिल्लीत पार पडणाऱ्या एनडीच्या बैठकीला शिवसेना उपस्थिती लावणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.